Home औरंगाबाद शेतकऱ्यांना पंचनामे न करता हेक्टरी 50 हजार रुपये द्या -संभाजी ब्रिगेड

शेतकऱ्यांना पंचनामे न करता हेक्टरी 50 हजार रुपये द्या -संभाजी ब्रिगेड

71
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद । अतिवृष्टीमुळे सर्व शेत पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे सरसकट अतिवृष्टी मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी, पीक विमा शेतकऱ्यांना तात्काळ देण्याचे आदेश विमा कंपनीला देऊन आर्थिक मदत करावी आदी मागण्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेड तर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह सपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीमुळे शेतक्यांच्या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील दोन-यार वर्षापासून पावसाचे पर्जन्यमान कमी असल्याने उत्पन्न घटले आहे व बोगस बियाणांमुळे महारष्ट्रातील शेतकरी त्रस्त होता त्यातच मागील सात महिन्यापासून कोरोनाच्या प्रभावामुळे शेत मालाला बाजार भाव मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले या हंगामामध्ये पिके चांगली आली होती. परंतु अतिववृष्टीने पिकांचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडून हवालदिल झाला आहे. यामुळे शासनाने पंचनामे न करता सरसकट हेक्टरी रू.50,000/-रु. ( पन्नास हजार) मदत म्हणून तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावी. तसेच पीक विमा रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश पीक विमा कपन्याना दयावेत व शेतकर्यांना भरघोस मदत करण्यात यावी, या मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वर्तीने औरगाबाद जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, महानगर अध्यक्ष वैशाली खोपडे, राहुल भोसले, बाबासाहेब दाभाडे, प्रकाश चोरघडे, तुषार जाधव, निलेश शेलार, रेखा वाहटूळे, रोहिणी खोपडे, वर्षा धावडे, जयश्री पोतदार आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here