Home मनोरंजन विराट बूट धुण्याची वेळ? अनुष्काने फोटो केला शेअर

विराट बूट धुण्याची वेळ? अनुष्काने फोटो केला शेअर

387
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा रंगत आहे. अनुष्का या काळात गरोदरपणातील दिवस एन्जॉय करत आहे. विशेष म्हणजे या काळातही ती तिच्या लूक आणि फॅशनसेन्सकडे चांगलंच लक्ष देत असल्याचं दिसून येतं. तर दुसरीकडे तिचा पती म्हणजेच क्रिकेटपटू विराट कोहली, अनुष्काची काळजी घेताना दिसत आहे. अलिकडेच अनुष्काने विराटचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट त्याच्या बूट धुतांना दिसत आहे.

अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये विराटचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट त्याच्या स्पाइक्सला लागलेली माती धुतांना दिसत आहे. दौऱ्यावर जाण्यापूर्वी नवऱ्याला इतकं मन लावून चिखलाने माखलेल्या बूट साफ करताना पकडलं आहे, असं कॅप्शन अनुष्काने या फोटोला दिलं आहे.

https://instagram.com/stories/anushkasharma/2439302507758200588?utm_source=ig_story_item_share&igshid=eack7mavkwdz

दरम्यान, अनुष्काने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत आहे. अनेक जण या फोटोला लाइक्स करत आहेत. विराट आणि अनुष्का लवकरच आई-बाबा होणार आहेत. या दोघांनीही एकाच वेळी इन्स्टावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here