Home अंबाजोगाई मनात कोणतीही भीती न बाळगता कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करून...

मनात कोणतीही भीती न बाळगता कोणत्याही अफवांना बळी न पडता लसीकरण करून घ्यावे –

688
0

अंबेजोगाई

( प्रतिनिधी)- कोरोना व्हायरसची देशभरात लाट आल्यानंतर त्यावर मात करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व सर्व मंत्रिमंडळाने राज्याच्या आरोग्य खात्यावर सोपविल्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे यांनी कोरोना काळात योग्य नियोजन करून राज्यातील कोरोणावर मात करण्यात यश मिळवले त्या काळात बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आशा वर्कर पासून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ,तालुका आरोग्य केंद्रातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून मेहनत घेतली म्हणून कोरोणाला आपण राज्यभरातुन हरवू शकलो आता कोरोणाचा समूळ नायनाट करण्यासाठी राज्यशासनाने आपल्याकडे लस पाठवली आहे लसी संदर्भात मनात कोणतीही भीती न बाळगता अफवांना बळी न पडता सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट यांनी लसीकरणाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना केले
पुणे येथील प्रयोगशाळेने तयार केलेली लस आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आल्यानंतर ही लस घेऊ इच्छिणार्‍या लाभार्थ्यांनी आपली नावे कोरोणाच्या ॲप वरून नोंदणी केली एकूण नोंदणी केलेल्या लाभार्थ्यां पैकी दररोज शंभर लाभार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे या लसीकरणाचा शुभारंभ आज आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील मुलांच्या वस्तीगृहातील इमारतीमध्ये करण्यात आला लसीकरण शुभारंभ कार्यक्रमाला बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ शिवकन्या शिरसाठ, केजच्या आमदार नमिताताई मुंदडा,विधान परिषदेचे आमदार संजयभाऊ दौंड ,बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे ,रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ धपाटे ,वैद्यकीय अधीक्षक डॉ राकेश जाधव, डॉ बिराजदार ,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव उबाळे, नगरसेवक सारंग पुजारी,शिनगारे,भराडीया, पाथरकर ,ताहेरभाई ,खलील मौलाना सह अनेक मान्यवर उपस्थित होते
लसीकरणासाठी नाव नोंदणी करणाऱ्या खासगी रुग्णालयाच्या डॉ शितल विलास सोनवणे ,डॉ सचिन पोतदार, डॉ वैशाली पोतदार, परिचारिका मस्के आदींचा सत्कार आदींचा सत्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला यावेळी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयाकडे तर सर्व सुविधा उपलब्ध होत्या मात्र बीड जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य विभागातील डॉक्टर ,कर्मचारी, आरोग्य सेवक ,आशा वर्कर असा एकही कर्मचारी, अधिकारी सुटला नाही की त्याने कोरोना काळात आपले योगदान दिले नाही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा सभापती म्हणून आपल्याला या कामाचा आपल्या विभागातील कर्मचारी यांनी दिलेल्या योगदानाचा नक्की अभिमान आहे लसीकरणाच्या मोहिमेत सुद्धा शासकीय आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचारी काम करेल असा आपल्याला विश्वास वाटतो असेही बजरंग सोनवणे यांनी विश्वास व्यक्त केला
केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता ताई मुंदडा म्हणाल्या की कोरणा काळात अनेकांनी जगाचा निरोप घेतला मात्र या काळात आरोग्य विभागातील कर्मचारी, डॉक्टर ,परिचारिका यांनी दिलेली सेवा एकही नागरिक विसरू शकत नाही महाराष्ट्राच्या पुणे येथील प्रयोगशाळेत लस तयार झाली ती लस महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत उपलब्ध करून दिली आज त्या लसीकरणाचा शुभारंभ होत आहे या लसीकरणासाठी ज्यांनी आपली नावे नोंदवली त्यांनी मनात कुठलीही शंकाकुशंका न आणता लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही आमदार मुंदडा यांनी केले विधान परिषदेचे आमदार संजय भाऊ दौंड यांनी कोरोणा काळात राज्यभरातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे यांनी कोरोना काळात रात्रंदिवस मेहनत घेतली म्हणून महाराष्ट्रात कोरोना व्हायरस आटोक्यात आला नागरिकांनी अजूनही आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कोरोना पूर्णपणे राज्यातून गेलेला नाही कोणत्याही वेळेला पुन्हा येऊ शकतो त्यामुळे नोंदणी केलेल्या नागरिक,आरोग्य कर्मचारी,डॉक्टर यांनी लसीकरण करून घ्यावे आमदार दौंड यांनी उपस्थितांचे अचानक एका मुद्द्यावर लक्ष वेधून घेतले ते म्हणाले की कोरोणा काळात राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी आपला जीव धोक्यात घालून अनेक नागरिकांची जीव वाचवले मात्र त्यावेळी खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अशा वेळी पुढे यायला हवे होते विशेषता आंबेजोगाई शहरातील काही खासगी रुग्णालयाचा अपवाद वगळता अनेक डॉक्टरांनी आपले रुग्णालय त्या काळात बंद ठेवले होते त्या वेळी नव्याने कोरोणाची लाट आली होती डॉक्टरांनाही कोरोणाचा अभ्यास नसल्याने तसे झाले असेल भविष्यात अशी परिस्थिती उद्भवली तर खाजगी डॉक्टरांनी सुद्धा या काळात पुढे येऊन योगदान द्यावे अशी सूचना आमदार संजय दौंड यांनी केली
शासकीय रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ धपाटे म्हणाले की अधिष्ठाता डॉ सुक्रे सरांना अचानक काम निघाल्याने अधिष्ठाता पदाचा माझ्याकडे पदभार दिला गेला राष्ट्रीय कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींना कमी वेळात बोलावले सर्वजण आले लसीकरणाच्या कार्यक्रमात नोंदणी केलेल्या व्यक्तीनी लसीकरण करून घ्यावे असेही आवाहन त्यांनी केले लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ वेदपाठक यांनी लसीकरणासाठी नोंदणीची प्रक्रिया सांगत लसीमुळे कुठलाही त्रास होणार नसून लस घेतल्यानंतर अर्धा तास यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहेत त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय उप अधीक्षक डॉ विश्वजीत पवार यांनी केले लसीकरणाच्या कार्यक्रमाला आरोग्य विभागातील डॉ मोरतळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लोमटे, डॉ अरुणा केंद्रे,डॉ जाधव तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ राकेश जाधव मेंटर्न भताने मॅडम ,डॉ लामतुरे डॉ कचरे ,डॉ बिराजदार ,डॉ प्रशांत देशपांडे यांच्यासह रुग्णालयातील इतर विभाग प्रमुख डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका कार्यक्रमाला उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here