Marathwada Sathi

गावरान कोंबडी टेस्टीच लागतंय …


मराठवाडासाथी न्यूज
मुंबई :
करोना आजाराच्या काळात शरीरातील उष्णता व प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गावठी कोंबड्या उपयुक्त असल्याचा समज अनेक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून गावठी कोंबड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परिणामी या कोंबड्यांच्या दरांमध्ये दुप्पट-तिपटीने वाढ झाली आहे. अनेकदा संकरित वाणांची किंवा देशी जातीच्या कोंबड्यांची विक्री गावठी कोंबड्या म्हणून केली जात असल्याने नागरिकांची फसवणूक होत आहे.पूर्वी १५० ते २०० रुपये प्रति किलो दराने मिळणारी गावठी कोंबडी सध्या साडे ४०० ते ५०० रुपये किलो इतक्या दराने विकली जात आहे.

Exit mobile version