Home औरंगाबाद गावगुंड दानवे मोठ्यांचा पदर धरून मोठा झाला…!

गावगुंड दानवे मोठ्यांचा पदर धरून मोठा झाला…!

327
0

मराठवाडा साथी न्यूज

जावई हर्षवर्धन जाधव यांनी केला हल्ला, प्रहारच्या कार्यकर्त्यांना दिला पाठिंबा

औरंगाबाद : रावसाहेब दानवे यांचे कर्तृत्व शून्य आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंनी आता नरेंद्र मोदींच्या आर्शिवाद ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे मोठे होतात तसेच दानवे पुढे आले. त्यामुळे सत्ता कधीच जाणार नाही या अविर्भावात त्यांचे वर्तन असते. यातूनच त्यांचत्विधान शेतकरी विरोधात असून त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी दानवेंचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली.

शुक्रवारी (दि.११) दुपारी त्यांनी शिवाजीनगर परिसरातील ज्या जलकुंभावर ‘प्रहार’चे कार्यकर्ते आंदोलन करीत आहेत. त्या जलकुंभावर जाऊन त्यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. जलकुंभावर आंदोलनस्थळी त्यांच्यासोबत जाधव यांनी जेवण सुद्धा केले. यावेळी त्यांनी दानवे यांच्यावर जोरदार टीका केली.

अक्कल शुन्य दानवे : जाधव

हर्षवर्धन जाधव म्हणाले, केंद्रीय मंत्री असलेल्या जबाबदार व्यक्तीकडून असे वक्तव्य होणे चुकीचे आहे. आंदोलन सुरु असताना कुठल्याही केंद्रीय मंत्र्यांनी नेमकी अडचण काय आहे? हे जाणून घेऊन सरकार आणि आंदोलकांमधील दुआ म्हणून काम करावे. मात्र, हे सोडून शेतकऱ्यांना पाकिस्तान आणि चीनचे हस्तक संबोधणे म्हणजे गावगुंडांप्रमाणे केलेले अक्कल शून्य व्यक्तव्य आहे. देशाला ज्यांनी सावरले त्या शेतकऱ्यांची दानवे यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणीही जाधव यांनी केली.

दानवेंचे कर्तृत्व शून्य

रावसाहेब दानवे यांचे कर्तुत्व पूर्णपणे शून्य आहे. आधी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि आता प्रधानमंत्री मोदी यांच्यामुळे ते निवडून येतात. मोठ्या माणसाचा पदर धरून गावगुंड जसे पुढे जातात तसे दानवे पुढे आले आहेत. एखाद्या गावागुंदाप्रमाणे सत्तेच अमरपट्टा असल्यासारखे त्यांचे वर्तन असते अशी टीकाही जाधव यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here