Home इतर कोथरूडमध्ये ‘गवा’…!

कोथरूडमध्ये ‘गवा’…!

250
0

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : कोथरुडमधील महात्मा सोसायटी घुसलेला गवा अखेर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जेरबंद केला. आज सकाळी महात्मा सोसायटील नागरिकांनी या गव्याला पाहीले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. जंगलातील हा वनगवा शहरात आलाच कसा? हा प्रश्न निरूत्तीत राहीला आहे.

गवा आलाच कसा?

कोथरुड सारखी दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात गवा दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शहराच्या मध्य भागात गवा आलाच कसा? यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा स्थानिकांमध्ये रंगल्याचे चित्र दिसत आहे. या भागामध्ये सध्या या गव्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत अाहेत.
एका सोसायटीतून दूसऱ्या सोसायटीत

मानवी वस्तीत आलेल्या या जंगली प्राण्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला. सकाळी साडेअकराच्या सुमारास वन अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. तोपर्यंत गवा उजवी भुसारी कॉलनीमधील एका सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये शिरला. लोकवस्तीमध्ये शिरल्याने काही ठिकाणी धडक दिल्याने गव्याच्या तोंडाला काही प्रमाणात दुखापत झाली.
वनाधिकाऱ्यांची पळापळ

वन विभागाच्या अधिकाऱ्यांची या गव्याला पकडताना चांगलीच दमछाक झाली. वन अधिकारी या गव्याचा पाठलाग करत असतानाच तो पौड रोड वरील मुख्य रस्त्यावर पोहचला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काहींनी त्याला पाहण्याससाठी गर्दी केली. वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोरीच्या मदतीने पकडण्याचे प्रयत्न सुरू केले.

अखेर गवा जेरबंद

दोरीच्या मदतीनेही गवा ताब्यात येत नव्हता. गव्याला इंजेक्शन देण्यात आले. तरी देखील वन कर्मचाऱ्यानी गव्यावर नियंत्रण मिळवणे अवघड होते. गवा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना कोणत्याही प्रकारची दाद देत नव्हता. त्यामुळे जाळीच्या मदतीने त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास गव्याच्या तोंडावर कापड टाकून त्याला शांत करण्यात वनाधिकाऱ्यांना यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here