Home मनोरंजन ‘गंगूबाई काठियावाडी’ अडकला वादाच्या भोवऱ्यात…!

‘गंगूबाई काठियावाडी’ अडकला वादाच्या भोवऱ्यात…!

1015
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे पुन्हा एकदा ‘गंगूबाई काठियावाडी’ या त्यांच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत.या चित्रपटावर गंगूबाईच्या कुटुंबाने आक्षेप घेतला आहे. मुंबई शहर दिवाणी न्यायालयात हुसैन जैदी, संजय लीला भन्साळी आणि आलिया भटच्या विरोधात २२ डिसेंबरला खटला दाखल केला आहे.या प्रकरणी ७ जानेवारी, २०२१ पर्यंत तिघांना जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.हुसैन जैदी यांचे पुस्तक ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’मध्ये गंगूबाईची कहाणी आहे.या पुस्तकाच्या आधारेच ‘गंगूबाई काठियावाडी’हा चित्रपट बनविण्यात येत आहे.

दरम्यान,सध्या या चित्रपटाचे शूटिंग मुंबईतील फिल्मसिटीमध्ये होत आहे.’गंगूबाई काठियावाडी’या चित्रपटात डॉन गंगूबाईची मुख्य भूमिका अभिनेत्री आलिया भट साकारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here