Marathwada Sathi

औरंगाबादेत कोणत्याही क्षणी ‘टोळीयुद्धा’चा भडका ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार मोकाट
सरेआम खुन, मारामाऱ्या अन््् डान्सचा माज
जेलमध्ये जाण्याची नाही राहिली भीती
गुन्हेगारांशी छुपी हातमिळवणी ठरतेय तापदायक
औरंगाबादेतीलच नव्हे तर संभाजीनगरातील जनता असुरक्षित, पोलीस यंत्रणा हतबल

राकेश रवळे मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद ।
शहरात कोणत्याही क्षणी टोळी युद्ध भडकण्याची शक्यता आहे. शहरातील कुख्यात गुन्हेगार मोकाट सुटल्याने शहरातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे तर जेलमध्ये जाण्याची भीतीच गुन्हेगारांना राहिलेली नाही. त्यामुळे सरेआम मारामाऱ्या आणि खुन होत आहेत. पोलिसांशी या टोळ्यांशी असणारी ‘सलगी’ सर्वसामान्यांना तापदायक ठरते आहे. म्हणून ना औरंगाबादेतील नागरिक सुरक्षित आहे, ना संभाजीनगरातील.

मोठ्या टोळी युद्धाची तयारी
कोराेनाची लागण ज्यावेळी हर्सुल कारागृहात पोहोचली. त्यावेळी आणखी कैद्यांना त्याची लागण होऊ नये, म्हणून गुन्हेगारांना जामीनावर सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे एकमेकांच्या विरूद्ध उभ्या राहिलेल्या टोळ्यांचे म्होरके आणि त्यांचे फंटर एकाचवेळी बाहेर आले. गेल्या तीन महिन्यात त्यांनी चोऱ्या, मारामाऱ्या करून ‘खल्ली’ जमा केली.

आता सुरू झाली खुन्नस
काही टोळ्या शहराच्या वेगवेगळ्या भागात काम करतात. त्यामुळे ते एकमेकांच्या ‘टेरेटरीत’ आक्रमण करीत नाहीत. पण आता अस्तित्व वाढविण्याच्या प्रयत्नात या टोळ्या समोरा-समोर आल्या आहेत. त्यामुळे त्यांची ‘खुन्नस’ वाढली आहे. यातून कोणत्याही क्षणी शहरात टोळी युद्धाचा भडका उडू शकतो. कारण या गुन्हेगारांना आता जेलमध्ये जाण्याची भीती राहिलेली नाही.

कुठल्या भागात उडेल भडका?
शहरातील गुन्हेगारांचे आश्रयस्थान पुंडलिकनगर, भारतनगर, न्यायनगर, गजाजननगर, न्यू हनुमाननगर, जयभवानीनगर, विजयनगर या भागात आहे. याच भागात कोणत्याही क्षणी या टोळी युद्धाचा भडका होऊ शकतो. या टोळ्यांचे साम्राज्यही याच परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे गारखेड्यातील हाच भाग या टोळ्यांसाठी तसा महत्वाचा आहे.

पोलिसांशी छुपी युती
पोलिसांनी या टोळ्यांची माहिती नाही, असे नाही. त्यांचे काम करण्याची पद्धत ‘मोडस ऑपरेंडी’. त्यामुळे जर चोर पकडायचाच पोलिसांनी ठरविले तर काही तासात गुन्ह्यांचा तपास लागू शकतो. पण इथे मुद्दा आहे, तो छुप्या युतीचा. या टोळ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा ‘अर्थपूर्ण’ संवाद सुरू असल्याने कारवाई होत नाही. पण गुन्हेगार माहित असूनही गुन्ह्याची नोंद ‘अज्ञाता’ विरूद्धच होते.

Exit mobile version