Marathwada Sathi

आकाशगंगेत चांदण्या तयार होने झाले बंद?

नवी दिल्ली । आकाशगंगेत प्रारंभी १०० ते २०० करोड वर्षापर्यंतच गॅसयुक्त अणुन्नी प्रचंड प्रमाणात चांदण्या बनण्याची प्रक्रिया झाली. आकाशात झळकणाऱ्या चांदण्या आता तयार होण बंद झाले आहे. जवळपास एक करोड वर्षापूर्वीच चांदण्या तयार होण्याची प्रक्रिया मंदावली होती. आता आकाशगंगेत उपलब्ध हायड्रोजन गॅसयुक्त अणू संपल्यानंतर चांदण्या बनण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे.
भारतीय वैज्ञानिकंानी जगातल्या सर्वात मोठ्या टेलीस्कोपमधून ८५०० ग्रहांचे निरीक्षण करुन चांदण्या बनण्याची प्रक्रिया थांबबल्याचे कारणे उघड केली आहेत. भारतीय वैज्ञानिकंाचा हा शोध विज्ञानाचे प्रतिष्ठित मासिक ‘नेचर’ मध्ये प्रकाशित झाला आहे.
या शोधात पूर्णपणे भारतीय उपकरणे मुख्यत्वे जायंट मीटरवेव रेडियो टेलीस्कोपचा वापर केला अाहे. हा शोध लावणाऱ्या टीममध्ये पुण्यातील टाटा इंस्टीट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या नॅशनल सेंटर फॉर रेडियो एस्ट्रोफिजिक्स आिण बेंगलुरुच्या रमण रिसर्च इंस्टीट्यूटचे आिदत्य चौधरी, निसिम कनेकर, जयराम चेंगालुर, शिव सेठी व केएस व्दारकानाथ याचा समावेश आहे.

Exit mobile version