Marathwada Sathi

गदर २ चे चित्रीकारण पूर्ण लवकर चाहत्या चा भेटीस

अभिनेता सनी देओलच्या गदर २ या शूटींग नुकतेच पूर्ण झाले आहे.२००० च्या दशकात या चित्रपटाने मोठा धमाका केला होता. आता चित्रपटाचा पार्ट २ प्रेक्षकांना साद घालत आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर २ हा एक चित्रपट आहे ज्याच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहते या चित्रपटाचे इतके वेडे झाले आहेत की त्याची झलक किंवा काही अपडेट येताच सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू होते. ‘गदर 2′ चे अंतिम शूटिंग आता पूर्ण झाले असून तो आता ११ ऑगस्टला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. गदर २’ मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल तारा आणि सकीनाच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर उत्कर्ष शर्मा त्यांचा मुलगा जीतच्या भूमिकेत दिसणार आहे. फरक एवढाच की ‘गदर २’ मध्ये आता जीत मोठा झाला आहे.
गदर २ ची कथा १९५४ ते १९७१ पर्यंत दाखवण्यात येणार आहे. या काळात भारत-पाकिस्तानमधील १९७१ चे युद्धही दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात अनेक ट्विस्ट आणि अॅक्शन सीक्वेन्स असतील.

Exit mobile version