Home क्राइम शेतीच्या वादातून,केला चुलत्याचा खून…!

शेतीच्या वादातून,केला चुलत्याचा खून…!

167
0

मराठवाडा साथी न्यूज

जालना : जालन्यापासून जवळच असलेल्या मांडवा येथील शेतकरी रतन गिरजाजी खंडाळे (वय ६५) आणि त्यांच्या पुतण्यामध्ये शेतीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास रतन खंडाळे हे शेतात जात असताना, त्यांना रस्त्यात अडवून दोन पुतण्यानी काठीने मारहाण केली.डोक्यात काठीचा मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले.घटनेची माहिती कळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पोलिसांनी पाठविला आहे.पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेतले असून, दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here