Home औरंगाबाद गरिबांना लस मोफत…. !

गरिबांना लस मोफत…. !

244
0


मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद : दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना कोरोनाची लस मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. “सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रण्ट लाईन कर्मचारी, जुना आजार असलेले ५० वर्षांवरील रुग्ण अशा जवळपास तीन कोटी जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. उद्या आरोग्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत गरिबांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार आहे. गरिबांना लसीच्या दोन डोससाठी ५०० रुपये लादणं हे योग्य ठरणार नाही. केंद्र सरकारने हा खर्च उचलावा केंद्र सरकारने हा खर्च केला नाही तर राज्य सरकारच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. राज्य सरकारच्या राज्याच्या अखत्यारित येणाऱ्या लोकांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही राजेश टोपे यांनी म्हण्टले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here