Home औरंगाबाद एसबीआयच्या निवृत्त कॅशियरला भामट्याचा गंडा ; क्रेडिट कार्डवरून सव्वा लाख लांबवले

एसबीआयच्या निवृत्त कॅशियरला भामट्याचा गंडा ; क्रेडिट कार्डवरून सव्वा लाख लांबवले

9033
0

औरंगाबाद : एसबीआय (SBI ) क्रेडिट कार्ड कस्टमर केअरमधून बोलत असून तुमचे बंद पडलेले कार्ड सुरु करायचे आहे का ? असे सांगत एसबीआयच्या निवृत्त महिला कॅशियरला परप्रांतीय भामट्याने विश्वास संपादन करून सव्वा लाखांना गंडा घातला. विशेष म्हणजे भामट्याने त्यांच्या खात्याची व क्रेडिट कार्डची इत्यंभूत माहिती सांगितल्याने त्यांचा त्याच्यावर विश्वास बसला. मात्र, त्या महिला कॅशियरने नंतर कार्ड सुरु करते असे सांगूनही भामट्याने त्यांच्या कार्डवरून १ लाख २२ हजार स्वतःच्या खात्यावर वळते केले. हा प्रकार २६ एप्रिल रोजी एन- ४ सिडको भागात घडला. गौरव कुमार वर्मा (रा. सी -२, सत्यनगर, जयपुर) असे भामट्याचे नाव आहे. Speaking of SBI Credit Card Customer Care, do you want to start your closed card? Saying this, a retired female cashier of SBI was bribed by a foreign scoundrel for a quarter of a lakh.

शालिनी गोपाल चांदवाणी (६७, रा. बी विंग, ब्यु बेल हाऊसिंग सोसायटी, प्रोझोन मॉलच्या बाजुला) या स्टेट बैंक ऑफ इंडीयाच्या (state bank of India ) टाऊन सेंटर येथील शाखेत कॅशियर म्हणुन कामाला होत्या. त्या २०१४ साली सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडीयाचे (state bank of India ) व्हिसा क्रेडीट कार्ड असुन १ लाख २२ हजार एवढी खर्चाची मर्यादा आहे. परंतु, कित्येक दिवस ते न वापरल्याने बंद झालेले होते. दरम्यान, २६ एप्रिल रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास शालिनी यांना गौरव कुमार या भामट्याने मोबाईलवर संपर्क साधला. क्रेडीट कार्ड कस्टमर केअर वरुन बोलतोय असे सांगुन, तुमचे क्रेडीट कार्ड बंद झालेले असुन सुरु करण्यासाठी खात्याची माहीती विचारली. तेव्हा शालिनी यांनी त्याला सध्या कोरोना असल्यामुळे माझे क्रेडीट कार्ड बंद असून नंतर सुरु करेल असे सांगितले. मात्र, भामट्याने शालिनी यांची सर्व माहिती सांगुन त्यांचा विश्वास संपादन केला. वरून सर्व माहीती बरोबर आहे का ? असे विचारले. तेव्हा शालिनी यांनी बरोबर आहे असे सांगितले. त्यानंतर भामट्याने पुन्हा शालिनी यांना बचत खात्याची व डिबीट कार्डची माहिती विचारली. तेव्हा शालिनी यांना संशय आला. त्यांनी तात्काळ एसबीआय (SBI Credit card ) क्रेडीट कार्ड कस्टमर केअरला संपर्क साधून क्रेडीट कार्डची मर्यादा विचारली. तेव्हा त्यांनी १ लाख २२ हजार असल्याचे सांगून आत्ताच तुम्ही सर्व पैसे खर्च केले असल्याचे कळविले. हे ऐकून शालिनी यांना धक्काच बसला. त्यांनी मी पैसे खर्च केले नसल्याचे सांगितले. मात्र, शालिनी यांची कोणतीही परवानगी न घेता त्यांचे क्रेडीट कार्ड ब्लॉक करण्यात आले. तसेच फसवणुक झाली असल्याची तक्रार सुद्धा दाखल केली आहे असे सांगितले. यावरून आता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शालिनी यांनी थेट सायबर पोलीस (cyber police) ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तेव्हा गौरव कुमार वर्मा याने १ लाख २२ हजार स्वतःच्या खात्यात वळते केल्याचे उघड झाले. त्यानंतर १ जुलै रोजी शालिनी यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली.

एसबीआय कार्डच्या कर्मचाऱ्यांशी मिलीभगत !

शालिनी यांचे क्रेडिट कार्ड वापरात नसल्याने अनेक दिवसांपासून बंद होते. विशेष म्हणजे, बंद पडलेले कार्डबाबत भामट्याला माहिती मिळाली कशी ? विशेष म्हणजे शालिनी यांच्याबाबत सर्व माहिती भामट्याने बरोबर सांगितली. त्यामुळे एसबीआय कार्डचे कर्मचारी आणि भामटा यांनी मिलीभगत करून आपली फसवणूक केल्याचे शालिनी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here