Home क्राइम १८७ हॉटेल्स मध्ये ‘फसवणूक’…!

१८७ हॉटेल्स मध्ये ‘फसवणूक’…!

736
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन आपल्या ऐशोआरामाची इच्छा पूर्ण करुन तिथून पळ काढणाऱ्यास पोलिसांनी पकडले.आपल्या जीवाची मुंबई करण्याची आणि फुकटात उच्च प्रतीची जीवनशैली जगण्याची सवय लागलेल्यास चांगलाच दणका देण्यात आलाय. व्हीनसेंट जॉन असे या फुकट्या आरोपीचे नाव आहे.

देशातील विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये जात हाय प्रोफाईल सूट बुक करून त्याठिकाणी राहत उच्चप्रतीचे मद्य आणि सिगारेटची मागणी करून तिथून पळ काढणाऱ्या व्यक्तीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे .६५ वर्षाच्य़ा व्हीनसेंट जॉनने स्वतःच्या मौज मजेसाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रवास करत आतापर्यंत देशातील जवळपास १८७ वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेल व्यवस्थापनाची फसवणूक करत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here