Marathwada Sathi

अज्ञातांकडून चारचाकी गाड्यांची ‘तोडफोड’…!

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : पुण्यामधील बिबवेवाडी परिसरात काही अज्ञातांनी चारचाकी गाड्यांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.या घटनेमुळे नजीकच्या परिसरात दहशत पसरली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिबवेवाडी परिसरात शिवशंकर आणि निलकमल सोसायटीमध्ये असलेल्या चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.अगोदरच्या वादामुळे हि तोडफोड झाल्याचे सांगितल्या जात आहे.दरम्यान,ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या व्हिडीओच्या आधारे आरोपींविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.दरम्यान,पोलिसांकडून गुन्हेगारांचा तपास सुरू आहे.

Exit mobile version