Home औरंगाबाद औरंगाबादेत चलनातून बाद पाचशे रुपयांच्या ४०० नोटा जप्त

औरंगाबादेत चलनातून बाद पाचशे रुपयांच्या ४०० नोटा जप्त

4709
0

औरंगाबाद : चलनातून बाद झालेल्या पाचशे रुपयांच्या ४०० नोटा ज्यांची किंमत दोन लाख रुपये चिकलठाणा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास निपानी परिसरातील व्हिडिओकॉन कंपनीजवळील एका धाब्यासमोर करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गणेश मच्छिद्र राठोड (२७, रा. रा.डोनगाव तांडा ता. पैठण) याला अटक केल्याची माहिती सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांनी मंगळवारी दिली.

गणेश राठोड हा निपानी भागात व्हिडिओकॉन कंपनीजवळ नोटाबंदीनंतर सरकारने चलनातून बाद केलेल्या नोटा बदली करण्यासाठी घेवुन येणार असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी रात्री बाराच्या सुमारास राठोडला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या ४०० नोटा (दोन लाख रुपये), एक मोबाईल आणि विना क्रमांकाची दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई
पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, जमादार अजित शेकडे, पोलीस नाईक रविंद्र साळवे, सोपान डकले, दिपक सुरोशे, संतोष टिमकीकर, आण्णा गावंडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here