Marathwada Sathi

चार जणांचा मृत्यू, एकावर उपचार सुरू…!

मराठवाडा साथी न्यूज

बीड : औरंगाबाद-बीड राष्ट्रीय महामार्गावर गेवराई शहरालगत झमझम पेट्रोल पंपाजवळ गुरूवारी हा भीषण अपघात झाला. वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हा अध्यक्ष सदाशिव भिंगे व संतोष भिंगे यांचा जागेवरच तर व्यंकट सकटे, सदाशिव गर्दे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. राम भिंगे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. यामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर इतर दोघांचा उपचारादरमयान मृत्यु झाला. एक जण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

Exit mobile version