Home इतर तृणमूलच्या माजी खासदारांना ‘अटक’…!

तृणमूलच्या माजी खासदारांना ‘अटक’…!

344
0

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे.अंमलबजावणी संचलनालयाने केलेल्या कारवाईत मनी लॉन्ड्रींग प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार के डी सिंह यांना नवी दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.अलकेमिस्ट समूहाचे प्रमुख के डी सिंह यांच्यावर रोझ व्हॅली आणि सारदा चिटफंड घोटाळ्यात हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.या प्रकरणात चौकशीसाठी अंमलबजावणी संचलनालयानकडून सिंह यांना बोलाविण्यात आले होतं. दीर्घकाळ चौकशीनंतर त्यांच्या उत्तरांवर समाधानी नसल्यानं त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान,याअगोदर सुद्धा जून २०१९ मध्ये अंमलबजावणी संचलनालयाकडून सिंह यांच्याशी निगडीत कंपनीची २३९ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती.यामध्ये सिंह यांच्या रिसॉर्ट, शोरुम आणि बँक खात्यांचाही समावेश होता.अंमलबजावणी संचलनालयानं १९०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी निगडीत मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here