Home परभणी सर्वांगीण विकासासाठी जि. प. गोदावरी तांडा शाळा दत्तक घेतली…. शिक्षणाधिकारी डॉ सुचिता...

सर्वांगीण विकासासाठी जि. प. गोदावरी तांडा शाळा दत्तक घेतली…. शिक्षणाधिकारी डॉ सुचिता पाटेकर

243
0


मराठवाडा साथी
गंगाखेड,तालूक्यातील जि. प. प्राथमिक शाळा विकासाच्या प्रगतीपथावर असून ही शाळा लवकरच जिल्ह्यात नावारूपास येईल.सर्व शिक्षक मेहनती,कार्यतत्पर, कार्यक्षम असून विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या विकासासाठी तन मन धनाने कार्य करित आहे असे मत शाळेची पहाणी करताताना शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी करत सदरील शाळा दत्तक घेतल्याचे स्पष्ट केले.

गोदावरी तांडा येथील शाळा ही वर्ग 1ते 5 ची एकूण विद्यार्थी पटसंख्या 123 मुले मुली असलेली शाळा आहे.. गंगाखेड पासून पाच किलोमीटर च्या आत असलेले शाळा गावची लोकसंख्या एक हजार च्या आसपास पासुन गोदावरी शाळा ही 1982 ला स्थापन झालेली असून येथे सर्व बंजारा ऊसतोड करणारा व काही शेती ईतर व्यवसाय करणारा समाज आहे.

येथील लहान मुले आई वडील यांच्या सोबत ऊस तोडणीस जायची पण शिक्षक, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेवून सर्व मुले ऊस तोडी वेळीही गावातच राहून शाळेत येतील, यासाठी शिक्षकांनी शासनाचे हंगामी वसतीगृह सुरू करुन शंभर टक्के विद्यार्थी शाळेत येतील अशी जन जागृती केल्याने जवळपास शंभर टक्के विद्यार्थी शाळेत येवून वरचेवर गुणवत्ता सुधारू लागली शाळेत सन 2018 ला 67 विद्यार्थी ,2019 ला 95 विद्यार्थी,जून 2020 ला123 विद्यार्थी पटसंख्या आहे.

शाळेच्या गुणवत्ता व भौतीक विकासामुळे ही संख्या वाढीचाआलेख हा चढताच आहे.लाॅकडाऊन नंतर शाळासुरू होई पर्यंत ही पटसंख्या 130 च्या वरही जाण्याची शक्यता आहे. या संख्या वाढीमुळे सध्या असलेली शिक्षकांची मान्य पद संख्या तीन वरून पाच च्या वर जाणार आहे. सध्या शाळेत दोन नवीन शिक्षक पद निर्माण होणार आहेत. ही आमची तांड्यावरील जि. प. शाळा डॉ. सुचिता पाटेकर यांनी शाळे विषयी अतिशय जिव्हाळा दाखवून दत्तक घेत गोदावरी तांडा शाळा जिल्ह्यात एक आदर्श शाळा म्हणून लवकरच नावलौकीकास येणार यात शंका नाही असे मत स्पष्ट केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here