Home मनोरंजन फर्स्ट लूक रिलीज…!

फर्स्ट लूक रिलीज…!

798
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा आणि ‘बाहुबली’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या प्रभासचा ‘सलार’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.नुकतेच बुधवारी(२ डिसें.)‘सलार’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूक चे पोस्टर रिलीज करण्यात आले असून चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शन च्या कामालाही सुरुवात झाली आहे.

‘केजीएफ’ चित्रपटासारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे प्रशांत नील या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.त्यामुळे प्रेक्षक ह्या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी फार उत्सुक आहेत.प्रशांत यांनी फर्स्ट लूक शेअर करत त्याला कॅप्शन दिले आहे की, ‘सर्वात हिंसक लोक एका माणसाला सर्वात हिंसक म्हणतात.’ पोस्टर मध्ये प्रभासचा बंदूक घेऊन असलेला लूक बघून हा चित्रपट पूर्ण अ‍ॅक्शनने भरलेला असेल असे दिसते.

‘सलार’ चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरु करण्यात येऊ शकते,असे सांगण्यात येत आहे.या चित्रपटामध्ये प्रभास बरोबर अजून कोण-कोण दिसणार आहे याची अद्याप माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र तरीही चित्रपट संपूर्ण भारतात पाच ​​भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here