मराठवाडा साथी न्यूज
‘Liger: साला क्रॉसब्रीड’मध्ये झळकणार विजय देवराकोंडा
मुंबई : आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारा तेलगू अभिनेता विजय देवराकोंडा आता बॉलीवूडच्या एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून चित्रपटामध्ये तेलगू अभिनेता विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.
करणने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी चित्रपटाचा फर्स्ट लुकही प्रसिद्ध केला आहे.‘Liger: साला क्रॉसब्रीड’असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ तसेच निर्मिती धर्मा प्रोडक्शनची असणार आहेकरण जोहरने या चित्रपटाचा फर्स्ट लुक इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टरमध्ये विजय देवराकोंडा एका फायटरच्या भुमिकेत दिसत आहे. तसेच त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील रागीट दिसत आहेत. पोस्टरमध्ये विजयच्या पाठीमागे सिंह आणि वाघाचा अर्धा फोटो आहे.
https://www.instagram.com/p/CKLFVLTJAeC/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान,या चित्रपटात विजय देवराकोंडा आणि अनन्या पांडे सोबतच रोनित रॉय, विशु रेड्डी, मकरंद देशपांडे, राम्या कृष्णन आदी कलाकार दिसणार असून हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.