Marathwada Sathi

देशभर कोरोना लस पुरविणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला ‘आग’…!

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे.दरम्यान,यासंदर्भात माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या १० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देत खासदार गिरीश बापट सांगितले की,आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी आग लागली तिथं करोना व्हॅक्सीन बनत नाही तर बीसीजीसाठीची लस बनते. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत तरी कुठल्याही जिवीतहानीबद्दलची माहिती नाही. मी तातडीने घटनास्थळी रवाना होत आहे.

Exit mobile version