Marathwada Sathi

कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूत लागली आग,५ रुग्णांचा मृत्यू…!

मराठवाडा साथी न्यूज

राजकोट : गुजरातमधील राजकोट येथे एका कोविड रुग्णालयाच्या आयसीयूत लागलेल्या आगीत पाच कोरोना रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.तर, काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मावडी भागातील ‘उदय शिवानंद’ रुग्णालयात आज पहाटे ही दुर्घटना घडली आहे. आग लागली तेव्हा एकूण ३३ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते. त्यापैकी ११ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यापैकी जण थोडक्यात बचावले तर जणांचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version