Home क्राइम कंपनी विरोधात गुन्हा दाखल; रतन टाटा

कंपनी विरोधात गुन्हा दाखल; रतन टाटा

611
0


मराठवाडा साथी न्यूज
मुंबई : रतन टाटा यांच्या गाडीचा नंबर बेकायदेशीरपणे वापरणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंकशास्त्राचा फायदा घेण्यासाठी रतन टाटा यांच्या गाडीचा नंबर वापरण्यात येत असल्याचं उघड झालं आहे. मुंबई वाहतूक विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. कंपनीने आपल्या गाडीच्या नंबर प्लेटसोबत छेडछाड करत त्याला उद्योजक रतन टाटा यांच्या गाडीचा नंबर वापरला. याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाहतूकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे रतन टाटा यांच्या गाडीसाठी आकारण्यात आलेलं ई-चलान महिलेच्या नावावर फिरवण्यात आहे. त्यांनी सांगितलं की, महिलेने आपल्या आवडीची नंबर प्लेट ठेवण्यासाठी खऱ्या नंबरसोबत छेडछाड केली. परंतु आपण बदललेल्या नंबर हा रतन टाटा यांच्या गाडीप्रमाणे आहे, हे त्या महिलेला ठाऊक नव्हते. पोलिसांना एका खोट्या नंबर प्लेट असणाऱ्या गाडीसंदर्भात माहिती मिळाली होती. गाडीला सीसीटीव्ही फोटेजच्या आधारावर पकडण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की, या गाडीची मालक एक महिला असून ती एका खासगी कंपनीत काम करते. सध्या पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here