Home बीड राज ऑटो गॅरेज ला भिषण आग लाखो रुपयांचे नुकसान

राज ऑटो गॅरेज ला भिषण आग लाखो रुपयांचे नुकसान

89
0

माजलगाव : माजलगाव शहरातील जुना मोंढा परिसरात असणाऱ्या राज ऑटो गॅरेजला गुरुवारी रात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये ऑटो गॅरेज जळून पूर्णपणे खाक जाहले असून यामध्ये 10 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे दुकानाचे मालक संदीप चाळक नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजता दुकान बंद करून घरी गेले असता त्यांना परिसरातील लोकांनी फोन करून आग लागल्याचे कळवले आगीचे स्वरूप खूप मोठ्या प्रमाणावर होते या मध्ये दुकानाचे श ट र देखील पूर्णपणे लाल झाले होते त्या मुळे शटर पण उघडता येत नव्हते तब्ल दोन ते तीन तासां तासानंतर आग आटोक्यात आली यामध्ये अग्निशामक दलाच्या गाडीने दोन वेळा पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली या मध्ये दुकानातील गड्याचे पार्ट टायर स्पेअर पार्ट कॉम्प्रेसर मशीन फर्निचर बॅटरी फायबर आधी सर्व साहित्य जळून खाक झाली याबाबत संदीप छगन चाळक यांनी पोलीस स्टेशनला याची नोंद केली असून हे भीषण आगीमध्ये जवळपास 12 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे विघुत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे दिसून येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here