Home औरंगाबाद गावातील एका कुटूंबाच्या छळाला कंटाळून;पोलिस पाटील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न…!

गावातील एका कुटूंबाच्या छळाला कंटाळून;पोलिस पाटील महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न…!

395
0

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद : गावातील वाघ कुटुंब माझा आणि माझ्या कुटुंबाचा तीन वर्षांपासून छळ करीत आहे. त्यांना पोलिस आणि ग्रामस्थांची साथ आहे, असा आरोप करीत पोलिस पाटील महिला निर्मला बाळासाहेब हिवरेंनी आत्महत्येचा प्रयत्न केला.केळगाव (ता. सिल्लोड) येथील महिलेने आत्महत्या करण्यापुर्वीचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सिल्लोडच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, गावच्या पोलिस पाटील असणाऱ्या निर्मला बाळासाहेब हिवरे या केळगाव (ता. सिल्लोड) येथील रहिवासी आहेत. गावातील रामदास वाघ त्याची आई मीरा आणि बहिण सुनिता हे निर्मला यांना तीन वर्षांपासून सतत त्रास देतात. वाघ कुटुंब जाणीवपूर्वक शारीरिक, आर्थिक आणि मानसिक छळ करतात. रामदास वाघ पती घरी नसताना घरासमोर येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करतात. या प्रकाराला गाव सुद्धा पाठीशी घालत आहे. तसेच पोलिसांकडे रामदास वाघ यांनी खोट्या तक्रारी केल्या आहेत. पोलिस सुद्धा आमच्यावरील अन्यायाची दखल घेत नाहीत. या त्रास असहाय्य झाल्याने आत्महत्या करत आहे. याला गाव आणि पोलिस प्रशासन जबाबदार आहे. माझ्यानंतर कुटुंबाला न्याय द्या, असा व्हिडीओ निर्मला हिवरे यांनी केला आहे. यानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

त्यांची प्रकृती चिंताजनक

त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर सिल्लोड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून निर्मला यांचा आपबिती कथन करणारा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल केला. निर्मला हिवरे यांनी झालेल्या प्रकारची पोलिसात तक्रार केली नव्हती अशी माहिती सिल्लोड पोलिसांनी दिली आहे. व्हायरल व्हिडीओची दखल घेऊन पोलिस पुढील कारवाई करणार आहेत. दरम्यान, वडिलांच्या मृत्यूस हिवरे कुटुंब जबाबदार असल्याचा वाघ कुटुंबियांचा आरोप आहे. पोलिस तपासात यात काही निष्पन्न झाले नव्हते. मात्र, वाघ कुटुंब तेव्हापासून हिवरे यांना त्रास देत असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here