Home परभणी पाथरी पोलिस ठाण्यातील फौजदार निलंबित

पाथरी पोलिस ठाण्यातील फौजदार निलंबित

पोलिस अधिक्षकाचा झटका; लाचेची मागणी फौजदाराच्या अंगलट

876
0

मराठवाडा साथी न्यूज

परभणी: जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी पाथरी पोलिस ठाण्यात कार्यरत एका फौजदारास कर्तव्यात कसूर केल्याबद्दल बुधवारी(दि. दोन) निलंबित केले.
पाथरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले फौजदार टोपाजी कोरके असे निलंबित केलेल्या फौजदाराचे नाव आहे.

पाथरी पोलिस ठाण्यातील फौजदार श्री. कोरके यांनी कर्तव्यात बेशिस्त, बेजबाबदार, नैतिक अधःपतनाचे वर्तन तसेच लाचखोर वृतीचे वर्तन केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे अधीक्षक श्री.मीना यांनी नमूद केले आहे.

पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीकडून त्याच्यासह त्याच्या 5 नातेवाईकाना जमानत करण्यासाठी सहकार्य पाहिजे असल्यासह लाचेची मागणी करित लाच स्वीकारुन फौजदार श्री कोरके यांनी जनमानसात पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याचा उल्लेख पोलिस अधिक्ष श्री मिना यांनी केला आहे.


पाथरी ठाण्यातील एक कर्मचारीही निलंबित
: पाथरी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी रमेश मुंडे यांच्यावर जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. रमेश पांडुरंग मुंडे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.दरम्यान पोलीस कर्मचारी श्री . मुंडे यांनी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झालेल्या एका गुन्ह्यातील व्यक्तीस दिवसभर ठाण्यात थांबवून ठेवले. रात्री जमानत मिळवून देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी केली.पैसे देण्यास होकार मिळाल्यानंर एका फॉर्मवर सह्या घेतल्या व उद्या जमानत करून देतो असे म्हटले.

त्यानंतर काही वेळाने तेथील होमगार्ड केशव मुंडे यांच्यामार्फत जमानत करण्यासाठी संबंधित व्यक्तीस जमानतीसाठी 30 हजार रूपयांची मागणी केली. इतकी रक्कम देण्यास तयार नसल्याने त्यास रात्रभर पोलीस कोठडीत ठेवण्याचे बेकायदेशीर कृत्य केल्याचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी नमूद केले.

विशेष बाब म्हणजे पोलीस कर्मचारी मुंडे बाभळगाव बिटमध्ये कार्यरत नसताना व त्या गुन्ह्याशी त्यांचा संबंध नसताना श्री. मुंडे यांनी होमगार्ड मुंडे मार्फत तीस हजार रुपये लाच मागत बेकायदेशीर कृत्य केल्याचे आदेशात नमूद केले आहे. निलंबन काळात पोलीस मुख्यालयात नियुक्तीचे आदेशात नमुद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here