Marathwada Sathi

नराधम पित्याचा पोटच्या मुलीवर चार वर्षे अत्याचार

मराठवाडा साथी न्यूज

औरंगाबाद । बाप नावाला काळीमा फासणारी घटना वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे बुधवार रात्री उघडकीस आली आहे. बाप नात्याला काळीमा फासणाऱ्या बापाविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या विषयी पोलिसांनी मिळालेली माहिती अशी की, आकाश (वय ४२, रा. वडगाव कोल्हाटी नाव काल्पनिक ) हा परिसरातील एका कंपनीत कामाला होता. कुटुंबासह वडगाव कोल्हाटी परिसरात राहतो. चार वर्षापुर्वी त्याच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर तो आपल्या दोन मुलांसह राहत आहे. एका मुलीचे वय 15 आणि दुसऱ्या मुलाचे वय 12 वर्ष आहे.
पत्नीचे निधनानंतर महिनाभरातच आकाशने पोटच्या 15 वर्षीय मुलीसोबत असभ्य वागण्यास सुरवात केली. बापाच्या या वागण्यामुळे घाबरलेल्या मुलीने विरोध केल्यानंतर त्याने मारहाण करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्याने सतत तिला धमक्या देऊन तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. आईचे निधन आणि घरात लहान भाऊ यामुळे ती अत्याचार मुकपणे सहन करीत होती. पत्नीच्या निधनानंतर त्याने ६ महिन्यातच दुसरा विवाह केला. दुसरी पत्नीला तो मारहान करुन माहेरी पाठवत होता. आणि आपल्या मुलीवर अत्याचार करत होता. आपल्यावर वडील अत्याचार करत असल्याची माहिती मुलीने सावत्र आईला दिली नाही कारण वडील तिलाही मारहाण करत होते.
वडीलाच्या अत्याचाराची माहिती दिली नाही. चार वर्षापासून सुरु असलेल्या अत्याचारामुळे ती सतत एकटी राहुन रडत असल्यामुळे लहान भाऊ याने विचारल्यानंतर तिने भावाला होणाऱ्या अत्याचाराबद्दल सांगितले. बहिणीवर वडील अत्याचार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भावाला धक्का बसला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास आपलाला कोण सांभाळेल यामुळे दोघा बहिण भावानी या बद्दल कोणालाही काहीच सांगितले नाही. मात्र
वडील सतत अत्याचार करीत असल्यामुळे ती नाराज राहत असल्याने तिच्या मैत्रीनीने विचारल्यानंतर तिने घडत असलेला सर्व प्रकार मैत्रिणीला सांगितला.
मैत्रीण आणि भाऊ यांनी तिला पोलीसात तक्रार देण्याचा आग्रह केला. बापाच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या तिने मैत्रीण आणि भाऊ याना सोबत घेऊन बुधवार ७ ऑक्टोंबर रोजी पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांची भेट घेऊन बापाने आपल्या बरोबर केलेल्या अत्याचाराची सर्व माहिती दिली.
यानंतर पोनि सावंत यांनी तिला सर्व मदत करण्याचे आश्वासन देऊन दिल्यानंतर तिच्या तक्रारी वरून बापाविरुध्द गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिस पथकाने नराधम बापाला ताब्यात घेऊन अटक करून न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आहे.

Exit mobile version