Home क्राइम वडिलांची केली मुलानेच हत्या ..

वडिलांची केली मुलानेच हत्या ..

95
0
Crime scene on a rainy night with evidence markers, selective focus / high contrast image; Shutterstock ID 789623020; Purchase Order: -


मराठवाडा साथी
चंद्रपूर : चंद्रपूर मधील एक १८ वर्षाच्या मुलाने रागाच्या भरात जन्मदात्या वडिलाची हत्या केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नांदगाव येथील घटना आहे. ४५ वर्षांच्या शंकर फोफरे यांचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळून आला होता. शेतात काम करताना मुलगा राहुल याचा वडिलांसोबत क्षुल्लक वाद झाला होता.

राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांच्या हातात असलेल्या विळ्याने हत्या करून मृतदेह शेताच्या बाजूला ओढत नेऊन टाकल्याचं तपासात उघड झालं. पोलिसांनी अवघ्या तीन तासात चौकशीचे जाळे विणत आरोपीला ताब्यात घेतले. एकुलत्या एक मुलानं वडीलांची हत्या केल्यानं परीसरात खळबळ उडाली आहे. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here