Marathwada Sathi

शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवून….

मराठवाडा साथी न्यूज
दिल्ली :
दिल्लीत मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. यादरम्यान आंदोलक शेतकऱ्यांपैकी काहीजण लाल किल्लावरच्या बुरूजावर चढले. शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे.
यामध्ये काही जणांनी लाल किल्ल्याच्या बुरूजावर काही झेंडे फडकवले. या प्रकारानंतर सोशल मीडियावर याचे पडसाद उमटू लागले आहेत.
आंदोलकांनी बुरूजावरचा भारतीय झेंडा उतरवून खलिस्तानी झेंडा फडकवल्याचा दावा अनेकांकडून केला जात आहे. हे कृत्य करणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे.

Exit mobile version