Marathwada Sathi

समृद्धी महामार्गावरील शेतकऱ्यांना योग्य रास्ता द्यावा…!

मराठवाडा साथी न्यूज

वर्धा : समृद्धी महामार्गाच्या बाजुला शेतकऱ्यांच्या शेताला लागून होणाऱ्या भिंतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीची वहिवाट बंद होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच पावसाचे पाणी शेतात शिरून पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी भूमिगत गटार बांधकाम योग्य पद्धतीने करण्यात यावे असे निर्देश पशुसंवर्धनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिले.आर्वी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी सांगितलं .महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनीतील छोटे तुकडे शिल्लक राहिल्यामुळे शेतकरी तिथे पीक घेऊ शकत नाहीत.

महामार्गाच्या कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य आजूबाजूच्या गावातील रस्त्यांचा वाहतुकीसाठी उपयोग करण्यात आल्यामुळे जिल्हातील आणि गावरस्ते खराब झाले आहेत. महामार्गाच्या कामामुळे खराब झालेले हे सर्व रस्ते दुरुस्ती करून देण्यात यावे तसेचआर्वी तालुक्यातील सर्व शेत पांदण रस्त्यांची कामे कंपनी सामाजिक दायित्व निधीतून करून देण्याच्या सूचना केदार यांनी केली आहे.

Exit mobile version