Home औरंगाबाद शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका : पंकजा मुंडे

शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका : पंकजा मुंडे

79
0

सरकारकडून मदत मिळवून देऊ, शेतकऱ्यांशी साधला संवाद, नुकसानीची पाहणी

मराठवाडा साथी न्यूज
पैठण । परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवार दि. 23 ऑक्टोबर रोजी पाचोड परिसरात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली . पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधत तुम्ही खचून जाऊ नका सरकार कडून मदत मिळवून देऊ असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडेे यांनी दिला.
यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कल्याण नाना गायकवाड, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायन भुमरे यांची उपस्थिती होती. पाचोड परिसरातील मुरमा, देवगावसह भालगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असल्याने शासनाने सरसकट मदत जाहीर करावी. तुम्ही धीर खचू देऊ नका सरकार कडून मदत मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कल्याण गायकवाड यांनी नुकसान झालेल्या शेतीची व शेत पिकांची माहिती पंकजा मुंडे यांना दिली.

पंकजा मुंडे यांनी पैठण तालुक्यातील पाचोड परिसरातील शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. खचून जाऊ नका आम्ही तुमच्या तुमच्या पाठीशी आहोत, असा धीर शेतकऱ्यांना दिला. तसेच शेतकरी दादाराव डिघूळे व महिला शेतकरी शोभाबाई दाणे यांच्याकडून नुकसानीची माहिती व इतर समस्या मुंडे यांनी जाणून घेतल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here