Marathwada Sathi

‘शेतकऱ्यांना स्थगिती मान्य नाही….

मुंबई : केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. या या तिन्ही कायद्यांना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध (Farmers Protest) केला. त्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु केले. आजही हे आंदोलन सुरुच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकारले. आज सर्वाच्च न्यायालयाने तीन्ही कृषी कायद्यांना स्थगिती दिली असली तरीही शेतकऱ्यांना ही स्थगिती मान्य नाही. हे कायदे सरकारने कायमचे रद्द करावेत, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.केंद्रीय कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तात्पुरती स्थगिती घातली. शेतकऱ्यांच्या निषेधावरील याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांची अंमलबजावणी थांबविली. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतरही शेतकरी आपले आंदोलन संपविण्यास तयार नाहीत आणि कायदा रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे.

Exit mobile version