Marathwada Sathi

…शेतकऱ्यांना 31 डिसेंबर पर्यंत अर्ज कराता येणार!

महाराष्ट्र यांत्रिकीकरण उप अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांनी दिनांक 31 डिसेंबर पर्यंत लाभासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत अशी सूचना कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. लाभाच्या अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व ट्रॅक्टर संचलित यंत्र, अवजारे, पावर टिलर, कांदाचाळ, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, ठिबक, तुषार संच, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, मल्चिंग अशा विविध घटकांसाठी अर्ज करता येतील.
कृषी विभागाच्या सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्यासाठी सातबारा, 8 अ उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लाभार्थी चा जातीचा दाखला, आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक असणे अनिवार्य आहे. कृषी विभाग आशा योजना दरवर्षी राबवते. 2020-21 वर्षातील कृषी यांत्रिकीकरण उपयोजनेतील घटकांचा लाभ घेण्यासाठी जश्रीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी संदर्भात तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे.

Exit mobile version