Home बीड पाटबंधारे विभागात शेतकऱ्यांनी जाळून घेतले

पाटबंधारे विभागात शेतकऱ्यांनी जाळून घेतले

आत्मदहणाचा ईशारा देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने पाली (ता.बीड) येथील एका शेतकऱ्याने नैराश्येतून पाटबंधारे विभागाच्या जिल्हा मुख्यालयात आंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले. जखमी अवस्थेत त्या शेतकऱ्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

606
0

मराठवाडा साथी न्यूज

बीड: जमीन संपादन प्रकरणात पाटबंधारे विभागाकडून न्याय मिळत नसल्याने थेट पाली (ता. बीड) येथील एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा ईशारा दिला होता. मात्र, प्रशासनाकडून दूर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत आंदोलक शेतकऱ्याने मंगळवारी (दि.24) दुपारी पांटबंधारे विभागाच्या कार्यालयात स्वत: आंगावर पेट्रोल टाकून पेटऊन घेतले. जखमी अवस्थेत आंदोलक शेतऱ्यास पुढील उपचारार्थ बीड च्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाली येथील अर्जून कुंडलिकराव साळुंके यांची जमीन पाटबंधारे विभागामार्फत संपादीत केली आहे. दरम्यान अर्जून साळुंके याच्या संपादीत जमीनाचा एकत्रीकरणाचा वाद आहे. संपादीत जमनी बाबत अर्जुन साळुंके अनेक वर्षापासून न्यायाच्या प्रतिक्षेत पाटबंधारे विभागाचे उंबरे झिजवत आहेत.

संपादीत जमीनीच्या संदर्भात तोडगा काढून न्याय मिळविण्यासाठी चकरा मारणाऱ्या अर्जुन साळुंके यांनी मागील महिन्यात पांटबंधारे विभागास आत्मदहनाचा ईशारा दिला होता. प्रत्यक्षात आत्मदहनाचा ईशारा देऊनही प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याच्या नैराश्येने अर्जुन साळुंके यांनी मंगळवारी (दि. 24) दुपारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून पेटऊन घेतले.

पाटबंधारे कार्यालयाच्या आवारातच आंदोलनकर्त्या शेतरकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याने कार्यालयीन कामकाजात व्यस्त असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यामध्ये खळबळ उडाली. कामासाठी आलेल्या नागरीकांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.  न्यायाच्या प्रतीक्षेत पेटऊन घेतलेल्या अर्जुन साळुंके यांना जखमी अवस्थेत पुढील उपचारार्थ जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here