Marathwada Sathi

हा लोकप्रिय कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : विनोदवीर कपिल शर्मा हा गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीने चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न करतो.‘कॉमेडी नाईट्स…’ किंवा त्यानंतरचा ‘द कपिल शर्मा शो’, प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून कपिलने आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करीत त्यांना हसवले आहे.मात्र,आता कपिल काही काळासाठी चाहत्यांचा निरोप घेणार आहे.‘द कपिल शर्मा शो’ हा अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांपासून दुरावणार आहे. हा कार्यक्रम जरी पुढील महिन्यात बंद होणार असून यामागची कारणे मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत. निर्मिती संस्था आणि वाहिनीनं अतिशय महत्त्वाच्या कारणांचा आढावा आणि निरिक्षणानंतर हा कार्यक्रम काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

या कार्यक्रमात कपिल शर्मा सूत्रसंचालन करत असून कार्यक्रमात किकू शारदा, कृष्णा अभिषेक, भारती सिंह,अर्चना पूरण सिंह असे कलाकारही झळकतात. मात्र,फेब्रुवारी महिन्यापासून मात्र हे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाहीत.२०१८ मध्ये सुरु झालेल्या या कार्यक्रमाला दमदार कामगिरीनंतर आता काही काळासाठी अल्पविराम मिळणार आहे.

दरम्यान,सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या कोरोनामुळे शो ला लाईव्ह प्रेक्षकांची उपस्थिती नाही,चित्रपटही ठरवून प्रदर्शित केले जात असल्यामुळे कलाकारांचीही कार्यक्रमाला उपस्थिती कमीच आहे.त्यामुळे आता कार्यक्रमाला अल्पविराम देत काही काळानंतर परिस्थिती अगोदर सारखी झाल्यानंतरच पुन्हा कार्यक्रम सुरु करण्याचा विचार करण्यात येईल.मात्र,कपिल शर्मा शो आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळे चाहत्यांध्ये काहीशी नाराजी बघायला मिळत आहे.

Exit mobile version