Marathwada Sathi

खिलाडीचा हा लुक बघून चाहते झाले चकित…!

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी अर्थातच अक्षय कुमार याच्या आगामी ‘बच्चन पांडे’या चित्रपटाच्या शूटिंग ला सुरुऊवाट झाली असून अक्षयने चित्रपटातील त्याच्या लुकचा फोटो शेअर केला आहे.या फोटोमध्ये अक्षयने काळ्या रंगाचा कुर्ता आणि निळा जीन्स असून तो राऊडी अंदाजात कारवर बसलेला दिसत आहे.यामध्ये त्याने डोक्यावर लाल रंगाचा रूमाल बांधलेला दिसत आहे.

इंस्टाग्राम वर फोटो शेअर करत त्यावर अक्षयने कॅप्शन दिले आहे की,नवीन वर्षात ‘बच्चन पांडे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.साजिद नाडियाडवाला सोबत हा माझा १० वा चित्रपट आहे आणि मी पुढेही त्यांच्या चित्रपटात काम करत राहिल, मला तुमच्या शुभेच्छाची आवश्यकता आहे आणि मी कसा दिसत आहे हे सांगा.

दरम्यान,‘बच्चन पांडे’मध्ये अक्षय कुमार ,कृती सैनन मुख्य भूमिकेत असून अरशद वारसी, जॅकलिन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी हे देखील चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/CJu2RYjnOKj/?utm_source=ig_web_copy_link

Exit mobile version