Marathwada Sathi

अंधश्रद्धेचा फायदा घेत पुण्यातील कुटुंबाची लूट…!

मराठवाडा साथी न्यूज

पुणे : पुण्यातील एका कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवत भोंदूबाबाने कुटुंबाला चक्क सहा लाख रुपयांचे कबुतर विकत घ्यायला लावल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या कुटुंबाची ६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असून तुमच्या मुलावर करणी झाल्याची खोटी बतावणी भोंदू व्यक्तीने संबंधित कुटुंबाला केली.करणीमुळे मुलाचा मृत्यू संभवतो, अशी भीती दाखवून आरोपीने करणी काढण्याच्या नावाखाली कुटुंबाला ६ लाख रुपये किमतीचे कबुतर विकत घ्यायला लावले.

दरम्यान,कबुतर विकत घेतल्यास घरातील व्यक्तीचा मृत्यू टळेल,आणि त्याच्या ऐवजी कबुतरांचा मृत्यू होईल,असे सांगत कुटुंबाकडून आरोपीने तब्बल ६ लाख ८० हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे.या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अबिजुर फतेहपुर वाला यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर आरोपी कुतूबुद्दिन नजमी याला पोलिसांकडून अटक करण्यात आले.

Exit mobile version