Marathwada Sathi

‘स्फोटक’ नेणाऱ्या ट्रकमध्येच ‘स्फोट’…!

मराठवाडा साथी न्यूज

बंगळुर : दक्षिण भारतातील कर्नाटकात असणाऱ्या शिवमोगा जिल्ह्यामध्ये गुरुवारी(२१ जाने.)रात्रीच्या सुमारास स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्फोटकांनी भरेलल्या एका ट्रकमध्ये हा स्फोट झाला असून या अपघातातमजुरांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचे स्वरुप इतके मोठे होते की,नजीकच्या परिसरातही त्याचा परिणाम जाणवला.फक्त एव्हढेच नाही तर या स्फोटामुळे रस्त्यालाही भेगा गेल्या.त्यामुळे या अपघातामध्ये मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खोदकामासाठी ही स्फोटके नेण्यात येत होती. त्याचवेळी दगड तोडण्याच्या ठिकाणी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास एक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे शिवमोगाच बरोबरच चिक्कमंगळुरू आणि दावणगेरे या जिल्ह्यांमध्येही याचे हादरे जाणवले.नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटाचे स्वरुप भीषण होते.

दरम्यान,सोशल मीडियावरही याबाबतची माहिती काही युजर्सकडून पोस्ट करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट जिलेटीन नेणाऱ्या एका ट्रकमध्ये झाला. ज्यामुळे ट्रकमधील सर्व मजुरांचा मृत्यू झाला.

Exit mobile version