Home इतर तरुणीची छेड काढणे पडले महाग…!

तरुणीची छेड काढणे पडले महाग…!

28
0

मराठवाडा साथी न्यूज

पाटणा : खुपदा रोड रोमिओंच्या भीतीने मुली घराबाहेर निघणे देखील बंद करतात. मात्र,अश्या रोड रोमिओला न घाबरता एका तरुणीने अश्या तरुणाला चांगलीच शिक्षा दिली आहे.या तरुणीने तिची छे़ड काढणाऱ्या तरुणाची चप्पलांनी चांगलीच धुलाई केली.सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला आहे.

बिहारच्या कटिहार रोड गौशाला चौकात एका रोड रोमिओने तरुणीची छेड काढली.त्यानंतर या तरुणीने त्याला पकडून चप्पलने बेदम मारहाण केली.त्यानंतर स्थानिकांनी देखील या तरुणाला बेदम मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले.दरम्यान,या प्रकरणी नगर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here