Home औरंगाबाद खर्च केंद्र सरकारने करावा..

खर्च केंद्र सरकारने करावा..

712
0

मराठवाडा साथी न्यूज
औरंगाबाद :कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च हा केंद्र सरकारने करायला हवा अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. शिवाय एका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरनाला मान्यता द्यावी अशी मागणी देखील राजेश टोपे यांनी दिली आहे. लसीकरणासाठीच्या कोल्ड चैन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या टप्यातील लसीकरणाचा पहिला डोस अंदाजे अडीच महिन्यात पूर्ण होऊ शकेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. ८ जानेवारी राज्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन होत आहे. कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसांमध्ये लसीकरण मोहिम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची लस मोफत मिळणार की पैसे लागणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्ट्रातील ३० जिल्हे आणि २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबवण्यात येणार आहे. राज्यात चार जिल्हे वगळून ड्राय रन होणार आहे.केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्ट्रातील ३० जिल्हे , २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ३ आरोग्य संस्था आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये १ आरोग्य संस्था याठिकाणी हा ड्राय रन घेण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here