Marathwada Sathi

खळबळजनक! रस्त्यावर आढळला ‘मृतदेह’…!

मराठवाडा साथी न्यूज

संगमनेर : रस्त्यावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे नाशिक-पुणे महामार्गालगत रस्त्यावर घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोन संशियतांना ताब्यात घेतले आहे. त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक-पुणे महामार्गालगत आंबीफाटा परिसरात खंदरमाळवाडीच्या हद्दीत एक अनोळखी ४५ ते ५० वर्षीय इसमाचा मृतदेह बुधवारी(२७ जाने.)सकाळी आढळून आल्याने नजीकच्या परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेची घारगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, राजू खेडकर, सुरेश टकले, संतोष खैरे, किशोर लाड, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण, गणेश तळपाडे, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, कुंडलिक साळुंके आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान,मृत अज्ञात व्यक्तीचे ओळख पटविण्याचे काम सुरू असून मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेतून शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आला असून व्यक्तींची कसून चौकशी घेतल्या जात आहे.

Exit mobile version