Marathwada Sathi

जास्तीच्या सामानाची होणार होम डिलिव्हरी…!

मराठवाडा साथी न्यूज

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने जास्तीचे सामान घेऊन प्रवास करणार्‍यांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे.त्यामुळे जास्तीचे सामान घेवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता त्यांच्या सामानाची चिंता करण्याची गरज नाही.यासाठी रेल्वेने ‘बुकबॅगेज’ नावाचे एक नवीन अॅप सुरू केले आहे.या अॅपच्या माध्यमातून भारतीय रेल्वे तुमच्या सामानाचे हव्या त्या ठिकाणी वितरण करू शकणार आहे.फक्त एव्हढेच नाही तर हे सामान योग्यप्रकारे सॅनिटाइज आणि पॅकींग करुन तुम्हाला हव्या त्या ठिकाणी पोहचवले जाणार आहे.

सोबतच ट्रेन डेस्टिनेशन स्टेशनवर आल्यानंतर,तुमचे सामान बर्थमधून उतरवलेही जाणार आहे.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना प्रति बॅग १२५ रु.द्यावे लागणार आहेत.बॅग वाहतुकीपासून ते हेलकऱ्यापर्यंत(कुली)सर्व खर्च रेल्वे करणार आहे. यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नसणार.रेल्वे विभागाने या सेवेला एका खास अ‍ॅपशी जोडले आहे.ही सुविधा विशेषतः वयोवृद्ध प्रवाश्यांसाठी सोयीची असणार आहे.

दरम्यान,आपण आपल्या मोबाइलवर बुकबॅगेजचे अॅप डाउनलोड करुन या सेवेचा लाभ घेऊ शकता.या अ‍ॅपद्वारे तुम्ही सामानाचे बुकिंग करू शकता. तुम्ही होम डिलीव्हरी प्रकारची बुकिंग केली तर रेल्वे सुटण्याच्या तीन तास अगोदर तुमच्या घरातून तुमचं सामान पिकअप केले जाईल.त्याचबरोबर ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर तुमचे सामान तुमच्या डब्यापर्यंत पोहचवले जाईल.

Exit mobile version