Home मुंबई मुख्यमंत्री असलो तरी माझे पाय जमिनीवरच…!

मुख्यमंत्री असलो तरी माझे पाय जमिनीवरच…!

83
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : ‘मी जरी मुख्यामंत्री असलो तरी माझे पाय जमिनीवर आहेत’. त्याचबरोबर माझे पाय क्लच वर आहेत, ब्रेकवर आहेत, एक्सिलेटरवर आहेत आणि हातात स्टिअरिंगपण आहे,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्याची गाडी माझ्याच हातात असल्याचं त्यांनी यातून अधोरेखित केल्याचे बोलले जात आहे.

वर्षभरापूर्वी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आले. आघाडीतील मोठा भाऊ म्हणून सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडं आलं. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे राजकारणात मुरलेले पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना कारभार करता येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आजही याबाबत उलटसुलट वक्तव्य केली जातात. मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी शरद पवारांना भेटलं पाहिजे. तेच राज्य चालवतात, अशी खोचक टीका विरोधी पक्षाचे नेते करता आहे हे चित्र सध्या दिसून येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here