Home मुंबई समझनवालों को इशारा काफी है…!

समझनवालों को इशारा काफी है…!

195
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : राऊत यांना आता ५ जानेवारीला ईडी समोर हजर व्हावं लागणार आहे. राज्याचं राजकारण गोंधळल आहे. ‘पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है’, असं संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यात ५५ लाखांची ट्रान्सफर कशाकरता करण्यात आली आहे याचा तपास करण्यासाठी ईडीने त्यांना नोटीस पाठवल्याच सांगितल आहे आता यावरुन संजय राऊत आणि भाजपमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळतेय.ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी अनेकवेळा भाजपवर टीका केली आहे. शिवसैनिकांनी ईडीच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर भाजप कार्यालय असे पोस्टर्स लावले .राऊत यांनी एक ट्वीट करुन समझनवालोंको इशारा काफी है असं सांगत भाजप नेत्यांना खुलं आव्हान दिलंय.

राऊत यांनी भाजपवर टीका करताना आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “माझ्या कुटुंबाला ईडीची नोटीस आल्याची बातमी प्रसारित झाल्यानंतर अचानक गोदी मीडियातले लहान कमळं फुलायला लागली आहेत. या राजकीय पोपटांचा वापर राजकीय कामांसाठी कशा पध्दतीनं केला जातोय हे जनतेला माहीत आहे. माझ्या कुटुंबाचं नाव पीएमसी आणि एचडीआयएल घोटाळ्यामध्ये विनाकरण गोवण्यात आलंय. त्यांना मी आव्हान देतोय की पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here