Home मुंबई झुक झुक गाडीचा प्रवास आनंददायी…!

झुक झुक गाडीचा प्रवास आनंददायी…!

455
0

मराठवाडा साथी न्यूज

मुंबई : आजपासून अमन लॉज ते माथेरान या मार्गावर मिनीट्रेन वाढवल्या आहे .अनलॉक फेजमध्ये माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे . त्यामुळे माथेरानच्या सेवेतही वाढ करण्याचा निर्णय मध्यरेल्वे प्रशासनाने घेतला आहे . आज पासुन रोज वेळा ट्रेन असणार आहे. माथेरानसाठी पहिली गाडी सकाळी साडेनऊ वाजता सुटेल तर माथेरान येथून शेवटची गाडी संध्याकाळी ४ वाजून २५ मिनीटांनी सुटेल. सध्या प्रवासाचं भाडे ४५ रूपये तर लहान मुलांसाठी ३० रूपये आहे. फर्स्टक्लाससाठी मोठया व्यक्तींना ३०० रूपये तर लहान मुलासाठी १८० रूपये तिकीट आकारण्यात येतंय . या वाढीव फेऱ्यांचा फायदा पर्यटकांबरोबरच स्थानिक रहिवाशांनाही होणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here