Marathwada Sathi

रेल्वे स्टेशनवरील चहा मिळणार आता ‘कुल्हड’ मध्ये…!

मराठवाडा साथी न्यूज

अल्वर : भारतातील सर्व रेल्वे स्थानकांवरचे चहाचे प्लास्टिक कप आता गायब होणार आहेत. कारण आता प्लास्टिक कप येवजी त्याची जागा ‘कुल्हड’ घेणार असल्याची माहिती राजस्थानमधील अल्वर जिल्ह्यात एका कार्यक्रमादरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिकमुक्त भारताचे आवाहन केले आहे. याअंतर्गत रेल्वेकडून कोणते बदल केले जाऊ शकतात याचे सर्व प्रयत्न केले जात असल्याचंही गोयल म्हणाले. रेल्वेच्या या धोरणामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल. देशातील सर्वच रेल्वे स्थानकांवर कुल्हडमधून चहा दिल्यास प्लास्टिक कपची मागणी कमी होईल. परिणाम प्लास्टिक कपच्या निर्मितीवरही आळा घालता येईल, असा यामागचा हेतू आहे.

“देशातील सध्या ४०० रेल्वे स्थानकांवर कुल्हडमधून चहा दिला जात आहे. पण प्लास्टिकमुक्त भारतच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकत लवकरच देशातील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्लास्टिक कपच्या जागी कुल्हड उपलब्ध करुन देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.यातून अनेकांना रोजगार देखील मिळेल”, असेही पियूष गोयल म्हणाले.

Exit mobile version