Home अर्थकारण १ डिसेंबर ला होणार नवीन बदल ….

१ डिसेंबर ला होणार नवीन बदल ….

102
0

मराठवाडा साथी न्यूज

 • मुंबई :
 • आरटीजीएस (RTGS) २४ तास
 • एलपीजी सिलेंडर किंमत (LPG Cylinder price)
 • प्रिमियममध्ये बदल (Premium Change)
 • धावणार नव्या ट्रेन
 • हफ्ता न दिल्यास..
 • आरटीजीएस २४ तास
  रिझर्व बॅंक ऑफ इंडीया ने आपल्या ऑक्टोबर क्रेडीट पॉलिसीमध्ये आरटीजीएस २४ तास सुरु ठेवण्याची घोषणा केलीय. एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी पर्याय दिलेयत. यामध्ये RTGS, NEFT आणि IMPS चा वापर जास्त केला जातो. गेल्या डिसेंबरमध्ये NEFT २४ तासांसाठी सुरु करण्यात आली होती. आरबीआयच्या गाईडलाईननुसार आरटीजीएस सर्व्हीस सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत मिळते.
 • एलपीजी सिलेंडर किंमत
  एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत प्रत्येक महिन्याचा पहिल्या तारखेला अपडेट होते. या किंमती कमी होऊन ग्राहकांना दिलासा देखील मिळू शकतो. अशात १ डिसेंबरला एलपीजी किंमतीत बदल होऊ शकतो.
 • प्रिमियममध्ये बदल
  आता ५ वर्षानंतर विमाधारकांना प्रिमियमची रक्कम ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. म्हणजे विमाधारक अर्ध्या हफ्त्यासोबत पॉलिसी सुरु ठेवू शकतील.
 • धावणार नव्या ट्रेन
  कोरोना काळात रेल्वे आपल्या सेवा हळूहळू सुरु करतेय. स्पेशल ट्रेन्सची संख्या वाढवण्यात आलीय. १ डिसेंबरपासून नव्या ट्रेन धावण्याच्या तयारीत आहेत.
 • हफ्ता न दिल्यास.
  कोरोना व्हायरस संक्रमणामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यायत. यामुळे अनेकांना विमा पॉलिसीचा हफ्ता वेळेवर देता आला नाहीय. खर्च जास्त असल्याने पॉलीसी वेळेवर न भरलेल्यांची पॉलीसी बंद होते. पण विमा कंपन्यांनी यामध्ये बदल केलाय. यानुसार आता ५ वर्षानंतर विमाधारक प्रिमियमची किंमत ५० टक्के कमी होऊ शकते. म्हणजेच ते अर्धा हफ्ता देऊन पॉलीसी सुरु ठेवू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here