मराठवाडा साथी न्यूज
वॉशिंग्टन : वर्षभर कोरोनाशी दोन हात केल्यानंतर आता अमेरिकेमध्ये कोरोना लसीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे.मात्र,आता या लसीबद्दल विस्कॉसिनमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.दरम्यान,एका फार्मासिस्टने जाणूनबुजून लशीचे ५७ डोस खराब केल्याचा आरोप करण्यात येत आहे.त्यामुळे ऑरोरा हेल्थ केअरच्या फार्मासिस्टला अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्याची ओळख अजून जाहीर केलीली नाही.
या प्रकरणी ऑरोरा हेल्थ केअरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जेफ बार यांनी सांगितले आहे की,फार्मासिस्टने जाणीवपूर्वक मॉडर्ना लशीचे ५७ डोस २४ डिसेंबरच्या रात्री फ्रीजमधून बाहेर काढल्या आणि पुन्हा २५ डिसेंबर रोजी फ्रीजमध्ये ठेवल्या. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा २५ डिसेंबर रोजी लशीचे डोस बाहेर काढले होते. त्यानंतर रविवारी सकाळी एक कर्मचाऱ्याला लशीचे डोस फ्रीजबाहेर आढळले. फ्रीजमधून बाहेर काढण्यात आलेल्या लशी ५७ जणांना देण्यात आल्या. फ्रीजमधून लस बाहेर काढल्यामुळे ही लस प्रभावी राहिली नसल्याचे बार यांनी म्हटले.
फार्मासिस्टने ही कृती जाणीवपूर्वक केली असल्याचा दावा बार यांनी केला. मात्र,असे करण्यामागे त्याचा उद्देश्य काय होता,हे सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.