Marathwada Sathi

वीज बिल येणार नाही, सोलार पॅनल लावा..

जर तुम्हाला 24 तास वीज हवी असेल तर ही योजना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.सध्यातरी सरकार सोलार पॅनल लावण्यासाठी लोकांना मदत करीत आहे. त्यासाठी एक स्किम चालवली जात आहे. तुम्ही तुमच्या घरावर, अंगणात सोलार पॅनल लावून सरकारी मदत घेऊ शकता. त्यामुळे तुमची महागड्या वीजेपासून कायमची सुटका होणार आहे.जसा उन्हाळा वाढेल तशी तुमच्या घरातील वीज गायब होईल, कारण उन्हाळ्यात वीजेचा अधिक वापर होतो. सद्या वीजेचे अधिक दर वाढल्यामुळे सगळ्यांना मोठा फटका बसत आहे, त्याचबरोबर भविष्यात सु्द्धा अशा पद्धतीचा फटका बसण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या घरी कायमची लाईट हवी असल्यास, तुमच्यासाठी सोलार हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारचं महिन्याचं लाईट बील भरावं लागणार नाही. तसेच सोलारवरती घरातील अनेक उपकरण देखील चालतात.केंद्र सरकार सोलार पॅनल अधिक लोकांना वापरावं यासाठी मदत करीत आहे. तुम्ही सोलार पॅनेल लावण्याचा प्रयत्न करीत असाल, तर सरकारची योजनेची नक्की माहिती घ्या. त्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमच्या घरात किती वीज लागणार आहे, याची माहिती घ्या.त्यानुसार तुम्हाला सोलार पॅनेल लावून घ्यावा लागेल. समजा तुमच्या घरात रोज दोन किंवा तीन पंखे चालतात, एक फ्रिज आहे, सात ते आठ एलईडी ब्लब चालतात, टिव्ही, अशा वस्तू तुमच्या घरात असतील तर, तुम्हाला सहा ते आठ युनिट वीज लागणार आहेतुम्ही तुमच्या घरावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल लावून तुम्हाला जितकी गरज आहे, तितकी असलेली वीज निर्माण करू शकता. मोनोपार्क बायफेशियल सोलर पॅनेल हे सध्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले सौर पॅनेल आहेत. विशेष म्हणजे पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंनी वीज निर्माण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर ‘रूफटॉप योजना’ सुरू केली आहे.

Exit mobile version